Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार ही शरद पवार यांनी काँग्रेसला दिलेली धमकी, नारायण राणेंचा...

शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार ही शरद पवार यांनी काँग्रेसला दिलेली धमकी, नारायण राणेंचा दावा

शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणूकीत महाविकास आघाडी सरकार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र लढणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना विश्वास असणारा पक्ष असल्याचे म्हणत शिवसेनेचं कौतुक केलं होतं. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी नवा दावा केला आहे. शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असे शरद पवार यांनी म्हटलंय परंतु ते निवडणूक लढवणार नाहीत. ही तर काँग्रेसला दिलेली धमकी आसल्याचा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी आणि ठाकरेंच्या वैयक्तिक भेटीवर मत व्यक्त केले होते. प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असे सांगत लगेच वेगवेगळ्या वावड्या उठवण्यात आल्या. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही, पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहतो आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणारा आहे, असे पवार म्हणाले. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही असे मोठे विधान शरद पवार यांनी केले.

शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत

- Advertisement -

शरद पवार यांच्या वक्तव्याचा नेहमी उलटा अर्थ लावायचा असतो. शरद पवार यांनी शिवसेनेसोबत निवडणूक लढवण्याचे म्हटले आहे. परंतु ते निवडणूक लढवणार नाहीत यामुळे ही काँग्रेसला असलेली धमकी आहे असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो” असे ट्विट नारायण भाजप नेते नारायण राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -