घरताज्या घडामोडीठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात, नारायण राणेंची खोचक टीका

ठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात, नारायण राणेंची खोचक टीका

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षात फक्त अडीच तासांसाठी मंत्रालयात गेले होते. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेले असं म्हणत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली.

नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच त्यांनी पक्षासंबंधी घेतला आहे. त्यांच्यावर लेखदेखील आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच हे भाजपच्या दारावर उभे होते. परंतु तेच कार्यकर्ते आता रडत आहेत.

- Advertisement -

‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकातून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिमटे काढले आहेत. ते फक्त मंत्रालयात दोनच वेळा गेले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, नारायण राणे म्हणाले की, दोन वेळा नाही तर फक्त एकच वेळ उद्धव ठाकरे हे मंत्रालयात गेले आणि अडीच तास बसून राहिले. जेव्हा मी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलो होतो. तेव्हा मला मंत्रालयातील स्टाफने सांगितलं की, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात फक्त अडीत तासांसाठी मंत्रालयात आले होते, असं नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेचा ठाकरेंवर घणाघात

- Advertisement -

वर्क फ्रॉम होमचा निर्णय हा कर्मचारी, कामगारांसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी होता. तो मुख्यमंत्र्यांसाठी नव्हता, असं म्हणत शिवसेनेचे (शिंदे गटाचे) नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. शिरसाटांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पवारांनी जे मंत्रालयात बसण्यावरुन ठाकरेंना टोचलं होतं त्यावरही राऊत बालिशपणा दाखवतं उत्तर देतात. शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसायला हवं. त्यावर राऊत म्हणतात की केंद्राकडून नोटीफिकेशन निघालं होतं की, सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं. पण केंद्राने काढलेला हा आदेश विद्यार्थी, कर्मचारी आणि कामगारांसाठी होता. मुख्यमंत्र्यांसाठी नाही. मुख्यमंत्री काय कामगार होते का?, असं म्हणत शिरसाट यांनी घणाघात केला आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री कामगार की विद्यार्थी? Work From Home चा निर्णय त्यांच्यासाठी कसा? शिवसेनेचा ठाकरेंवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -