Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात; नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात; नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव निर्बंधांमध्ये साजरा करावा लागत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात, अशी टीका नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केली.

नारायण राणे यांच्या घरी आज गणरायाचं आगमन झालं. यावेळी राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना निर्बंधांवर भाष्य केलं. सत्ताधाऱ्यांनी निर्बंध लावले आहेत. याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत. हिंदू सोडून कोणत्याही अन्य धर्मांवर त्यांचा सण साजरा करायला प्रतिबंध नाही आहे. फक्त हिंदू धर्माचे सण साजरे करण्यावर निर्बंध या सरकारने घातले आहेत. कोरोना देशात आहे, नुसता महाराष्ट्रात नाही. पण त्यांचा जास्त बाहू हा महाराष्ट्रात केला जातो, असं नारायण राणे म्हणाले.

कोरोनाचं संकट लवकर दूर होवो

- Advertisement -

नारायण राणे यांनी गणरायाकडे काय साकडं घातलं या प्रश्नावर उत्तर दिलं. गणरायाकडे काही साकडं घातलेलं नाही. गणरायाने आतापर्यंत आम्हा राणे कुटुंबियांना सुखी, समृद्धी आणि आनंदी ठेवलेलं आहे. मात्र, गणरायाकडे एक मागणं आहे की महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकराचं संकट येता कामा नये, कोरोनाचं संकट दूरू होऊदेत आणि आमच्या जनतेला सुखी समाधानी ठेवावं अशी प्रार्थना करतो, असं नारायण राणे म्हणाले.

 

- Advertisement -