घरताज्या घडामोडीराज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

राज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

Subscribe

राज्याला ड्रायव्हर नको आहे तर राज्याला चांगला मुख्यमंत्री लोकांचं हित पाहणारा पाहिजे आहे.

राज्यातील परिस्थिती भीषण झाली आहे. कोकणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, सिधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिक संकटात आहेत. मुंबईत दुर्घटना झाली तेव्हा मुख्यमंत्री गेले नाही परंतू गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला गेले यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्याला ड्रायव्हर नको आहे तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. तसेच कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? हा प्रश्न आहे. गाडी चालवत विठ्ठल दर्शनाला गेले परंतु चेंबूर आणि भांडूपमध्ये ज्यांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाहायला गेले नाहीत त्यांचे सांत्वन करण्यास गेले नाहीत. विठ्ठल दर्शनासाठी जाणं त्यांना महत्त्वाचं वाटत, राज्याला ड्रायव्हर नको आहे तर राज्याला चांगला मुख्यमंत्री लोकांचं हित पाहणारा पाहिजे आहे. महाराष्ट्र सरकारकडे असंख्य हजारो ड्रायव्हर पाहिजे आहेत. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला जायच नाही मात्र गाडी चालवत पंढरपूरला जायचं यामध्ये काय भूषण आहे. कर्तुत्व कुठे आहे यामध्ये असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून मदत पुरवणार

मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -