घरमहाराष्ट्रकेंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात

केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णलयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं. उद्यापासून पुन्हा एकदा भाजपच्या जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. त्यापूर्वी राणे यांचं चेक अप केलं जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. राज्यभरात राणेंविरुद्ध आंदोलनं झाली. अनेक ठिकाणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला. त्यानुसार राणे यांना पोलिसांनी अटक देखील केली. तद्पूर्वी नारायण राणेंचा रक्तदाब अर्थात बीपी वाढला होता. याशिवाय नारायण राणेंना मधुमेहाचाही त्रास आहे. राणेंना दोन दिवसापूर्वीच त्रास जाणवत होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दरम्यान, आज राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा उद्या सिंधुदुर्गात

नारायण राणेंच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालं आहे. पदोन दिवसापूर्वी झालेल्या राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या कारवाईमुळे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, उद्यापासून पुन्हा एकदा यात्रेला सुरुवात होत आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -