घरमहाराष्ट्रपुणेगिरीश बापट यांच्या निधनानंतर नारायण राणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

गिरीश बापट यांच्या निधनानंतर नारायण राणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

Subscribe

बापट यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात जाऊन बापट कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी नारायण राणेंनी गिरीश बापट यांच्या परिवाराला भेटून सांत्वन केले.

भाजप खासदार गिरीश बापट यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. बापट यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात जाऊन बापट कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी नारायण राणेंनी गिरीश बापट यांच्या परिवाराला भेटून सांत्वन केले.

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येतोय. नारायण राणे शनिवार पेठेतील गिरीश बापट यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या बाबतच्या आठवणी जागवल्या. “गिरीश बापट १९९५ साली पहिले आमदार म्हणून सभागृहात आले. त्यावेळी मी आमदार होतो. शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे आम्ही एकत्र काम करायचो. विधिमंडळाच्या कामकाजात ते पहिल्यापासून कार्यरत होते. अभ्यासू व्यक्तिमत्व, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे असा त्यांचा स्वभाव होता. भाजपच्या पुण्यातल्या कसब्यात त्यांचं काम उल्लेखनीय होतं. लोक त्यांना एक आदर्श लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून पाहत होते. त्यांचं काम पाहून समाधान वाटत होतं. गिरीश बापट असा निरोप घेतील, असं कधी वाटलं नव्हतं. गिरीशभाऊ आजारपणातून बाहेर कधी येतात, याची आम्ही वाट पाहत होतो.”, असं यावेळी नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या खासदारकीच्या जागेवर पोटनिवडणूक होणार का? यावर आता चर्चांना उधाण आलंय. त्यात आता नारायण राणेंनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर आता गिरीश बापट यांच्या कुटुंबातच कुणाला उमेदवारी देणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण मागील कसबा पोटनिवडणुकीत टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्यानं भाजपाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे तीच चूक पुन्हा न करता गिरीश बापटांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात बापट कुटुंबातीलच व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

या जागेवरून माजी खासदार अनिल शिरोळे, विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा केळकर यांच्यासह इतरही काही भाजप नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतो याबाबत उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -