घरमहाराष्ट्रनारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीनचं बिघडेल; ठाकरे गटाचा खोचक टोला

नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीनचं बिघडेल; ठाकरे गटाचा खोचक टोला

Subscribe

नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमध्ये AU नावावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, या गदारोळानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे. यावरून आता अधिक राजकारण रंगत आहेत.

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली, सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू होण्याआधी रिया चक्रवर्तीला AU नावाने सेव्ह केलेल्या नंबरवरून 44 फोन कॉल आले होते, यात बिहार पोलिसांच्या चौकशीचा हवाला देत, यातील AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती लोकसभेत देत राहुल शेवाळेंनी चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणे आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाल्याचे दिसले. जशी श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली तसेच आदित्य ठाकरेची करा, म्हणजे सर्व समोर येईल. A फॉर अफताब आणि A र आदित्य. सगळ्या विकृतीचं नाव एकसमान झालं आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली होती, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

नितेश राणेंच्या या टीकेला आदित्य ठाकरेंकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही, मात्र शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी नितेश राणेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजना घाडी म्हणाल्या की, नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची आधी नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टिकत नव्हत्या? यांच्या घरातले टीव्ही का फुटत होते? सिंधुदुर्गातल्या घराघरात हे माहिती आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी शिवसेनेला तुम्हा शिव्या घालता. याविषयावर बोलायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजना घाडी यांनी केली आहे.


मनसे वाढत चालल्याने विरोधकांना त्रास, राज ठाकरेंचा दावा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -