घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखे दाखवण्याचा प्रयत्न करू नका, नारायण...

किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखे दाखवण्याचा प्रयत्न करू नका, नारायण राणेंची राऊतांवर टीका

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे काल-परवा आले. त्यांना काय माहिती आहे? त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी हवं ते लिहिलं आहे. मला प्रश्न पडला आहे की पक्षप्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की हे आहेत? याचा खुलासा लवकरच होईल. परंतु संजय राऊत एकाकी पडणार आहेत. किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखे असण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याएवढी माहिती किरीट सोमय्यांकडेही नाही, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे भाजपामध्ये आहे, एवढा तरी विचार करा

एकीकडे ईडीनं संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली असताना दुसरीकडे राऊतांनी देखील सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेत घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांवर केला आहे. राज्यात आमचे १०५ आमदार आहेत. तुमचे ५६ आहेत. पुढच्या वेळी निम्मे तरी येतील का याचा विचार करा. तुमच्या वागण्याने नाही येणार. नारायण राणे भाजपामध्ये आहे, एवढा तरी विचार करा. या पक्षाला संपवण्याचं काम संजय राऊत चांगल्या पद्धतीने करत आहेत, असं राणे म्हणाले.

- Advertisement -

संपादक पदावरच्या माणसाने ज्या शिवा घातल्या…

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कमाई करावी आणि आडमार्गाने पैसा मिळावा यासाठी या सरकारमधील काही मंडळी प्रयत्न करत आहेत. मागील पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे काही विचार मांडले. ते पाहता, महाराष्ट्राची किंवा देशाची या प्रक्रिया पत्रकार परिषदेला भाषा वापरली. आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरच्या माणसाने ज्या शिवा घातल्या त्या मी उच्चारू शकत नाही. त्यावरून या माणसाचंच नाही. तर त्या वृत्त पत्राची दर्जा काय असेल किंवा काय आहे?, हे जनता चांगलेपणाने ओळखतेय, असं राणे म्हणाले.

पत्रकारिता हा पेशा असून धंदा नाहीये. सामना वृत्तपत्रामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात बातमी छापून आली होती. त्यावर देखील नारायण राणे यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचा टेरिफ खाली जात आहे. अनेक गुन्हे देशात आणि महाराष्ट्रात घडतात. पण गुन्हा घडला तर तो चोरीचा असो किंवा काळ्या पैश्यासंबंधी असो. त्याविरूद्ध समर्थनार्थ आंदोलन होतात. हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे.

- Advertisement -

तोल गेल्यानेच राऊतांचे सोमय्या यांच्यावर बेछूट आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत फ्लॅट, जमीन जप्त झाल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तोल गेला आहे. यामुळेच ते किरीट सोमय्या यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा संप व्यवस्थित हाताळता न आल्यानेच कामगारांच्या संयमाचा बांध सुटला, असेही राणे यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.

राणे यांनी सांगितले की, राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई कायद्यानुसारच आहे. राऊत यांनी आपल्या मालमत्तेबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडे खुलासा करावा. त्यांच्या ज्ञात उत्पन्नातून एवढी मालमत्ता कशी खरेदी केली याचा खुलासा करण्याऐवजी राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत.

किरीट सोमय्या यांच्यामागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभा आहे. राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करणे थांबवावे असेही राणे यांनी सांगितले. शराणे यांनी यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, सध्या राज्य मुख्यमंत्र्यांविनाच चालू आहे, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने एसटी संप, वीज टंचाई असे प्रश्न चिघळले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार न केल्यानेच कामगार संतप्त होऊन रस्त्यावर उतरले.

मातोश्री २ चे बांधकाम अनधिकृत

माझा जुहू येथील ‘अधिश’ बंगला नियमानुसार आहे. फक्त टेरेसवर भाज्या लावल्या तरी महापालिकेने ते बेकायदेशीर ठरले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री २ चे बांधकाम अनाधिकृत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
मातोश्री २ हे अनाधिकृत होते तरीही देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंजूरी दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. महापालिका अधिकारी पैसे कमवत आहेत. त्यांची नावे मी सीबीआयला देणार आहे. राणेंच्या खटल्यासाठी मोठे वकील दिले, पण मराठा आरक्षणावर वकील दिले नव्हते, असा दावाही राणे यांनी केला.

राज्य चालवण्यास महाविकास आघाडी असमर्थ ठरली आहे. सध्या ऐन उन्हाळ्यात राज्यात विजेचा तुटवडा भासत आहे. कारण कोळसा कंपन्यांची ८०० कोटींची थकबाकी महाराष्ट्र सरकारने दिली नाही. त्यामुळे जनतेला अंधारात रहावे लागेल. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल करत राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा किरीट सोमय्या एकटे नाहीत. देशात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपची देशात सत्ता आहे. काल संजय राऊतांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नाचत होते, फ्लॅट जप्त झाला म्हणून नाचत होते का? असा सवाल करत राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

यशवंत जाधव यांच्याकडे जे पैसै मिळाले याचे उत्तर कोणाकडे नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांकडे देखील या प्रश्नाचे उत्तर नाही. पैसे खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे. या सर्व मुद्यांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी संजय राऊत रोज काहीना काही आरोप लावत आहे. जाधवांकडे मिळालेले पैसे हे मुंबईतील जनतेच्या कराचे पैसे आहे. शिवसेनेने अनेक वेळा वेगवेगळ्या आंदोलनासाठी पैसे गोळा केले आहे. त्याचा हिशोब कधी पक्षाने दिला आहे का? असा प्रश्न नारायण राणेंनी केला.
ईडीच्या कारवाईत फ्लॅट, जमीन जप्त झाल्याने संजय राऊत यांचा तोल गेला आहे. यामुळेच ते किरीट सोमय्या यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत, असेही राणे म्हणाले.


हेही वाचा : ST Workers Protest: पवारांच्या घरावरील हल्ल्यावर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, म्हणाले…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -