घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचं मुळमुळीत भाषण अन् आदित्य ठाकरे पिल्लू; राणेंची ठाकरेंवर जहरी टीका

उद्धव ठाकरेंचं मुळमुळीत भाषण अन् आदित्य ठाकरे पिल्लू; राणेंची ठाकरेंवर जहरी टीका

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत अगदीच मूळमूळीत भाषण केलं. वीर सावरकरांबाबत उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. परंतु ज्या काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याशी आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेतात. आदित्य ठाकरे हे तर पिल्लू आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरेंवर जहरी टीका केली.

सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाणार नाही. उद्योगधंदे राज्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे. परंतु उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या काळात जे उद्योग गेले त्याबाबत कुणीही काही बोलत नाही, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

ठाकरेंची सावरकर आणि हिंदुत्त्वाविषयी काय भूमिका आहे? सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्त्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांनी हिंदुत्त्वाशी गद्दारी केली. त्यामुळे आता त्यांना हिंदुत्त्व हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही. आता त्यांनी वीर सावरकरांची कितीही माफी मागितली तरी फायदा होणार नाही, असंही राणे म्हणाले.

सत्ता गेल्यापासून सीमाप्रश्नावर बरेचजण बोलत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे असताना सुरुवातीच्या काळात बेळगाव, कारवार आणि निपाणीचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनावेळी लाठीचार्ज झाला आणि अनेक बळी गेले. तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता. आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांचा कधीच संबंध नव्हता. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात उद्धव ठाकरे कधीही मराठी माणसाच्या हक्कांच्या आंदोलनासाठी कुठेही गेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंना सीमाप्रश्नाबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही, असंही राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मराठी तरुणाचे वन रुपी क्लीनिक आता उत्तर-पूर्व रेल्वे स्थानकांवरही


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -