अजितदादांना नारायण राणेंचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले अकलेचे धडे…

आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष -उपाध्यक्ष ११ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठमोठी लोक आली, अक्कल सांगायला लागली होती, त्यांना आज अक्कल मिळाली असेल. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार याना मारत यापुढे जिल्हा बँकेचा कारभार शेतकरी, गोरगरीब, मजूर, युवा वर्ग, बेरोजगार यांच्यासाठी असणार असल्याचे मत केंद्रीय सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यानी जिल्हा बैंक अध्यक्ष उपाध्यक्ष निवड़ी नंतर बोलताना व्यक्त केले.

भाजपा प्रणीत पैनल चे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जनतेच्या हीताचे काम करतील.आज पर्यत सर्व निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली झाल्या त्यात सर्व अध्यक्षांनी चांगले काम केले, मात्र एक अपशकुन झाला,एक गद्दार निघाला.त्याला आज बँकेतून पळवून लावले आहे. तो जिल्हात उघड मानेने फिरू शकत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे.अशी टीका भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी माजी जिल्हा बैंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव घेता केली. जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी नंतर त्यानी जिल्हा बैंकेत कार्यकत्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

गोर गरिबांच्या हितासाठी मी जिल्हा बँक या पूर्वी निवडणू आणली होती आणि त्यावर अंकुश ठेवला होता. गद्दार असलेल्या लोकांनी जिल्हा बँकेची बदनामी केली मात्र भाजपा कडून असे काम होणार नाही.जनतेच्या हितासाठी काम केले जाईल. आपल्याच लोकांची बदनामी केली जात होती. शैक्षणिक संस्थे साठी आम्ही कर्ज काढले आहे वर्षाला सात ते आठ कोटी रुपये व्याज भरतो त्यामुळे आमची बदनामी करण्याचे काम काही लोकांनी केले अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

अन …आमदार नितेश राणे अवतरले

सिंधुदुर्ग जिल्हा बैंक निवडणुकीवेळी जिल्हा बैंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख व शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असल्याने अज्ञातवासात असलेले आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत आज अचानक जिल्हा बैंकेत अवतरले .सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट देत त्यानी नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले.आमदार नितेश राणे यांच्या भेटी ने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.जोरदार घोषणा व फटाकयांच्या आतश बाजी त नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आमदार राणे यानी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती .मुंबई हायकोर्टातील सुनावणी पूर्ण झाली असून सोमवार 17 जानेवारीला निर्णय होणार आहे . अटक पूर्व जामीनाची सुनावनी पुढे ढकलली तरी जिल्हा बैंक अध्यक्ष उपाध्यक्ष निवड़ीला आमदार नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत,मनीष दळवी उपस्थित राहू शकतात ,त्यानां अटक होऊ शकत नाही,तशी न्यायालयाने परवानगी दिल्याची माहीती ऐड संग्राम देसाई यानी दिल्याने आमदार नितेश राणे येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते


हेही वाचा : अज्ञातवासातील नितेश राणे अखेर सिंधुदुर्गात दाखल, १८ दिवसांनंतर जिल्हा बॅंकेत दिसले