Chipi Airport : बाळासाहेबांनी खोट बोलणाऱ्यांना थारा दिला नाही – नारायण राणे

Rane and uddhav thackeray

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विकासाबाबत काय भांड फोडायचे ? तुम्ही समजता तस नाहीए, आता सिंधुदुर्गमध्ये परिस्थिती बदलली आहे. बाळासाहेबांना खोट आवडल नाही. खोट बोलणाऱ्यांना थारा दिला नाही. सगळ तुम्हाला ब्रीफ होतय माहिती नाही, लोकप्रतिनिधी अपॉईंट करा आणि माहिती घ्या असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. सिंधुदुर्गात कोणी विकास केला याची माहिती लोकांकडून घ्या. लोकांच्या अडचणीला, आजाराला कोकणातून लिलावतीत कोण मदतीला येतो याचा आढावा घ्या. सिंधुदुर्गात परिस्थिती बदलली आहे त्यासाठीचे श्रेय हे मी आमदार झाल्यापासूनचे आहे. बाळासाहेबांनी मला १९९० साली सिंधुदुर्गाची जबाबदारी दिली तेव्हापासूनच या जिल्ह्यासाठी मी फिरून आतापर्यंतची विकासकामे केल्याचा दावा दिला. केवळ मनीऑर्डरवर अवलंबून असलेला जिल्हा ही सिंधुदुर्गची ओळख बदलली असल्याचेही ते म्हणाले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही आलात मला आनंद आहे, असे उद्धव ठाकरेंना उद्देशून नारायण राणे म्हणाले. आदित्य ठाकरे हे आता पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी कोकणातील पर्यटनाचा अभ्यास करावा. पर्यटनासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, कौलावरील घरे अशा सगळ्या बारीक गोष्टी कशा असाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. एअरपोर्ट झाला आहे, त्यासाठी पैसे द्या. इतक्या वर्षात धरणाला एक टक्काही पैसा पुढे गेला नाही. आज एअरपोर्टलाही पाणी नाही. तसेच ३४ कोटींचा रस्ता नाही.

विमानतळ झाल्यावर बाहेरच्या बाजुला खड्डे पहावे. सबस्टेशन झालेले नाही. रस्ते, एमआयडीसीने करायला हवे असेही राणे म्हणाले. उद्धवजी आणि बाळासाहेबांचा कर्तबगार मंत्री म्हणून तुम्ही कामगिरी करून दाखवा, असेही नारायण राणे यांनी आव्हान दिले.

प्रोटोकॉलवरून आगपाखड

नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलवरून चिपीच्या विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपली नाराजी अतिशय कडव्या शब्दात बोलून दाखवली. बाळासाहेबांना कधीच खोट आवडल नाही, त्यांनी खोट बोलणाऱ्यांना कधीच थारा दिला नाही. पण आय़आरबीच्या म्हैसकरांना बोलताना ते म्हणाले, साहेब आपण कंपनी विकली का असे विचारत त्यांनी विनायक राऊत यांच्या सूत्रसंचालनाच्या निमित्ताने सवाल केला.