मुख्यमंत्र्यांची २५ ते ३० वर्षे अंडी उबवण्याची टीका, नारायण राणेंनी दिले रोखठोक उत्तर

uddhav-and-rane-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यावर असताना काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचे नामोल्लेख न करताच टीका केली होती. या टिकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिले. नारायण राणे यांनी दादरा नगर हवेली येथे कमलाबेन डेलकर यांच्या विजयाच्या निमित्ताने क्रेडिट घेणाऱ्या शिवसेनेवर सडकून टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी पाहता नैतिकतेने राजीना द्यायला हवा, असेही नारायण राणे म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या केंद्रात मुसंडी मारण्याच्या वक्तव्याचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बारामती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इक्युबिशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २५-३० वर्षे काही अंडी उबवली परंतु त्यामधून पुढे काय झाले हे तुम्ही पाहता आहात असे मुख्यमंत्री नाव न घेता नारायण राणेंना म्हणाले होते. त्यावर नारायण राणे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. येणाऱ्या निवडणूकीला तुम्ही स्वबळावर लढा. म्हणजे तुमची काय पात्रता आहे, हे कळेल. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे तुम्हाला युतीची घोषणा केल्याने आमदार आणि सत्ता मिळाली. पण यापुढे तेदेखील पदरात पडणार नाही, असे नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या विषयावर बोलले नाही, ना एसटी कामगारांच्या विषयावर बोलले. ३० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला.

अंतुलेंनी आरोप झाल्यावर राजीनामा दिला होता

महाविकास आघाडी सरकारमधील इतक्या मंत्र्यांवर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू झाली आहे. अंतुलेंनी नुसता आरोप झाल्यानंतरही राजीनामा दिला होता. नैतिकता म्हणून महाविकास आघाडीतील सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही राणे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची आता तुरूंगात एकापाठोपाठ एक अटक होऊ रांग लागणार आहे. आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना खुद्द राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावयाकडे अनेक गोष्टी मिळूनही नवाब मलिक बोलतात.

असा मुख्यमंत्री पाहिला नाही

मुख्यमंत्र्यांची सगळी कामे ही मंत्रालयाएवजी मातोश्रीवरूनच चालतात. अनेकदा मुख्यमंत्र्यांना कुठे काय बोलायचे हे कळत नाही. अनेक विषय हे मुख्यमंत्र्यांना कळतच नाहीत. महाराष्ट्राचा सध्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री पदाला कलंक असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली. कोणत्या ठिकाणी काय मुद्दे मांडावेत यासारखी गोष्टही मुख्यमंत्र्यांना कळत नसल्याचे ते म्हणाले.

संजय राऊतांनी रात्रीचे काम दिवसा करायला सुरूवात केली आहे का ? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी विचारला. दादरा नगर हवेलीतून निवडून आलेल्या कमलाबेन डेलकर यांची निशाणी बॅट घेतलेला फलंदाज होता, धनुष्यबाण नव्हता असाही चिमटा राणेंनी काढला. त्याचवेळी शिवसेनेची साधी शाखाही दादरा नगर हवेतील नसल्याचे राणे म्हणाले. तुमचा खासदार टिकवा, नाही तर नंतर कळेल की तो भाजपमध्ये गेला आहे. संजय राऊत एका खासदाराच्या जोरावर जी केंद्रात टक्कर देण्याची भाषा करत आहेत, काही दिवसांनी डोक्याविना संजय राऊत दिसतील असाही इशारा राणेंनी यावेळी दिला.


हेही वाचा – २५ वर्षे उबवणी केंद्रे निर्माण केली, नको ती अंडी उबवली – उद्धव ठाकरे