घरताज्या घडामोडीमला अटक झाली नाही, विनंतीनुसार कोर्टात गेलो, नारायण राणेंचा खुलासा

मला अटक झाली नाही, विनंतीनुसार कोर्टात गेलो, नारायण राणेंचा खुलासा

Subscribe

संजय राऊत संपादकच्या लायक नाही आहेत. ते फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी लिहितात.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. परंतु अटक केली नसून पोलिसांच्या विनंतीनुसार कोर्टात गेलो होतो असा खुलासा स्वतः नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली यानंतर संगमेश्वर पोलीस स्थानकात नारायण राणेंना नेण्यात आलं होते. मी स्वतःच्या गाडीतून पोलीस स्टेशनला आणि कोर्टात गेलो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वक्तव्याची आठवणही करुन दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक आणि जामीन नंतर बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, मला अटक करण्यात आली नाही. पोलिसांच्या विनंतीनुसार स्वतःच्या गाडीने कोर्टात गेलो होतो. गाडीत बसल्यावर अटक झाली नव्हती. पोलिसांनी कोर्टात हजर करायचे आहे असं सांगण्यात आलं होते. कोर्टात जाईपर्यंत मला अटक करण्यात आली नव्हती असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे


उद्धव ठाकरेंवर राणेंचा हल्लाबोल

राणे म्हणाले की, मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहिती नाही. मला देशाबद्दल अभिमान आहे त्यामुळे मला सहन झाले नाही. म्हणून मी बोललो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर बोलले की, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? १२० बी होत नाही? तसेच मुख्यमंत्र्यांनी दुसरं वक्तव्य उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याबाबत केलं आहे. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्यांला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी राऊत लिहितात

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत संपादकच्या लायक नाही आहेत. ते फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी लिहितात. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देईल असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  नारायण राणेंच्या रडावर शिवसेनेतील तीन मंत्री


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -