घरताज्या घडामोडीशिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

शरद पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं करणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं - नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक आणि जामीन नंतर माध्यमांशी संवाद साधलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना माझ्यामुळे मोठी झाली आहे. शिवसेना मोठी करण्यामध्ये माझा मोठा सहभाग होता. त्यावेळी अपशब्द बोलणारेही नव्हते असा खोचक टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना सुसंकृतपणावरुन प्रश्न विचारला आहे. नारायण राणे यांनी संयमाची भूमिका बाळगली असून १७ सप्टेंबरनंतर बोलणार असल्याचे म्हटलं आहे. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो यापुढे कोणी असे बोलू नये यासाठी आम्ही बोललो असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना मोठी करण्यामध्ये माझं मोठं योगदान असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की, आठवणीत ठेवा तुम्ही कोणी माझं काही करु शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरुन उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही असे टीकास्त्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डागलं आहे.

- Advertisement -

शरद पवारांना प्रश्न

नारायण राणे यांनी सुसंस्कृतपणावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष नारायण राणे यांना प्रश्न केला आहे. “पवार साहेब, मुख्यमंत्री केलंत त्याचा सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला बोलतात चप्पलाने मारला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रति वादग्रस्त विधान केलं आहे. माननीय शरद पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं करणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं, त्यांनी चुकीचं केलं असं मला वाटत नाही” असे खोचक वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.


हेही वाचा : आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -