मुंबई : शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुतीसोबत जाणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. अवघ्या काही तासांमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातच नारायण राणे यांच्याकडून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. (Sharad pawar may get into alliance with mahayuti after maharashtra assembly election result.)
हेही वाचा : CNG Price Hike : निवडणूक निकालाआधीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात वाढ
प्रत्येक एक्झिट पोल्सने आपआपल्या सर्वेनुसार राज्यात नक्की कोणाचे सरकार येईल याविषयी अंदाज बांधला आहे. त्यामध्ये अनेक एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात बहुमताने महायुतीची सत्ता येईल, असे संकेत दिसत आहेत. या सर्व सुरू असलेल्या घडामोडींवरून शरद पवार हे निकालानंतर महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीसोबत जाणार, असा खळबळजनक दावा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
हेही वाचा : Kerala case : एफआयआर असला तरी सरकारी नोकरी नाकारता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. शरद पवार कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात, असे मला वाटते. तसेच शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाही. पवार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीसोबत जाऊ शकतात, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच उद्याच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणे देखील कठीण होणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आता शिवसेनेचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिलेले नाही. कारण संजय राऊतांनी संपूर्ण शिवसेनेची वाट लावली आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेल्याचे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar