घरताज्या घडामोडीकोरोनावर मात करण्यास राज्य सरकार अपयशी, नुकसानग्रस्तांच्या मदतीवरुन नारायण राणेंचे ताशेरे

कोरोनावर मात करण्यास राज्य सरकार अपयशी, नुकसानग्रस्तांच्या मदतीवरुन नारायण राणेंचे ताशेरे

Subscribe

शिवसेनेचे रुग्णांच्या टाळुवरचे लोणी खायचं काम

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जनता त्रस्त आहे. रुग्ण प्रमाणाबाहेर वाढत आहेत यामुळे जनता चिंतीत आहे. एका बाजूला कोरोना, मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परंतु सरकारी यंत्रणा कोरोना हाताळण्यात अपयशी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य खात्याचे ६० ते ६५ टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अधिकारी कर्मचारी, नर्स, वॉर्डबॉय नाही आहेत. जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन नाही डॉक्टरांची कमतरता आहे. खासगी डॉक्टर येतो आणि राऊंड मारुन जातो, एकाच वेळी ४ ते ५ हजार रुग्ण दाखल असताना १ डॉक्टर राऊंड मारुन जाणं ही सरकारची आरोग्य विभागाची कामगिरी दयनीय आहे. तर चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीची अजून भरपाई दिली नसल्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

सरकारला चिंता नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. विमानतळावर बैठक घेतली तेव्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनी एका तरी रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची माहिती घ्यायला पाहिजे होती अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत ६२८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल या जिल्ह्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनाचे नेते काही बोलत नाही आहे. कोरोनासाठी एक रुपया सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि पुढारी काढत नाही आहे. कोरोनावर मात करण्यास यंत्रणा चांगली राबवण्यासाठी सत्तेतील पुढारी पुढाकार घेत नाही आहेत.

- Advertisement -

सिंधुदुर्गात भाजपतर्फे राजन तेली, निलेश राणे, नितेश राणे यांनी अनेक विभागामध्ये कोरोनासाठी औषध पुरवली, इंजेक्शन आणि व्हॅक्सीन पुरवली आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एवढी मदत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार कुठे दिसत नाही आहेत फक्त राजकारण सुरु असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेनेचे रुग्णांच्या टाळुवरचे लोणी खायचं काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात आले नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. परंतु नुकसानग्रस्तांना भेटले का? कुठल्या घराची पाहणी केली का? तर नाही. जेमतेम दौरा २ जिल्ह्यांचा ३ तास आणि विमानतळावर जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून चर्चा १५ मिनीटे केली आणि मुंबईला परतले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा फोल ठरली आहे. त्यावर चर्चा नाही पुरवठा नाही यावर सरकार काय करणार रुग्णांच्या टाळुवरचे लोणी खायचं काम शिवसेना करत आहे. असे भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शिवसेनने कोकणाला काहीही दिले नाही. नुकसानग्रस्तांना दिलासा म्हणून २५० कोटीचा प्रस्ताव आहे. तर अंशता पडझड झालेल्या घरांना २५ हजार तर ५० टक्क्यांवर पडझड झालेल्या घरांना ५० हजार देणार आहे. ५० हजारमध्ये घर होते का सांगावे, कोकणात या एवढ्याशा रुपयात घर होते का असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -