घरताज्या घडामोडीराहुल गांधींनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला तो पक्ष रसातळाला गेला हा इतिहास,...

राहुल गांधींनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला तो पक्ष रसातळाला गेला हा इतिहास, राणेंचा टोला

Subscribe

पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार असून चिपळूमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

शिवसेना खासदार संजय राऊत संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असताना काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या जवळ आले आहेत. राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरुन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तो पक्ष रसातळाला गेला हा इतिहास असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत पक्षात कोणतीही चर्चा नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत आणि शिवसेनावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आता कुठे आहे क? ती संपत चालली आहे. यामुळे राहुल गांधींना आता कुणाचातरी आधार पाहिजे. पण जेव्हा जेव्हा राहुल गांधी कोणाच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतचा चर्चांवरही भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. यामुळे सामनामध्ये छापण्यासारखे काही नाही. म्हणून भाजपबाबत बातमी देत आहेत. लोकांना सांगण्यासारखे सामनाकडे काही नाही. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षात कोणतीच चर्चा नाही तसेच कोणतंही राजकारण नाही असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने घेतलेले निर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी एक रुपरेषा तयार करत असल्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकारने काय निर्णय घेतले याची माहिती जनतेला द्यायची असल्याचे नारायण राणे यांनी म्हटल आहे. तसेच पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर केंद्र सरकारने तात्काळ ७०० कोटी रुपये दिले. राज्य सरकारने केवळ दहा हजार दिले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार असून चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -