चिपी उद्घाटनाला पाहुणे म्हणून येताय… श्रेयावरून राणेंचा ठाकरे सरकारला टोला

Narayan Rane invite uddhav thackeray for fish lunch dinner
..तर मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गला म्हावऱ्यांचा पाहुणचार, राणेंचं आमंत्रण

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला चिमटे काढले आहेत. निमंत्रण पत्रिकेवर माझच नाव बारीक का झाले ? प्रोटोकॉलनुसार मी सिनिअर आहे, पण माझ नाव तिसऱ्या स्थानावर आहे. पण माझ नाव मात्र छोट झाले. ही वृत्ती असल्याचेही ते म्हणाले. राज्याचा मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री हे मानाच स्थान आहे. मुख्यमंत्र्यांना मी मान देतो. मुख्यमंत्री म्हणून नावात कोण आहे संबंध नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासात शिवसेनेचा कोणताही सहभाग नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली. हे कुठे होते ? चिपीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहुणे म्हणून बोलावलय, पाहुणे म्हणून या, असेही नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली. श्रेय लाटू नका, हे भाजपचेच श्रेय असल्याचेही मान्य करा असेही राणेंनी स्पष्ट केले. उद्घाटनाला या, पण आम्ही चिपीचे काम केलेय हे मान्य करा. उद्धव ठाकरेंशी वैर नाही, पण वेळ आल्यास पाहुणचार करणार असल्याचेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना मालवणी जेवण खायला घालू, असेही राणे म्हणाले.

चिल्लर बाजारात फिरते आहे

खासदार झाल्यावर हे गावी गेले, आताही गावातील लोक खासदार म्हणून ओळखत नाहीत, असा टोला नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना लगावला. आताही आम्हीच विमानतळ केले असा दावा करणाऱी चिल्लर बाजारात फिरत फिरते आहे, त्यांना पर्यटनाबद्दल काहीच माहित नव्हते. आता उद्घाटनाच्या वेळी मात्र श्रेय घेण्याचे प्रकार सुरू असल्याची टीका केली आहे. वादळ गेल्या काही वर्षात फटका कोकणाला बसला आहे. मात्र मदतीचे पाच पैसे आले नाहीत. कोकणाचा काहीच विकास केला नसल्याचेही राणे म्हणाले. कोकणात पहिले कॉलेज मी आणले. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते बालकेंद्र, शाळा, कॉलेज मदत केली असल्याचाही दावा त्यांनी केला. कोकणात शिक्षण आणि आरोग्यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मी जेव्हा आमदार झालो तेव्हा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३० हजार होते, आज एक लाख ९५ हजार आहे. राज्यात सिंधुदुर्ग पाचव्या स्थानी आहे. नुसत्या भातावर पाचवा क्रमांक येत नाही. जिल्ह्यात व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट आणल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी खासदारांचे उत्पन्न वाढायला काय प्रयत्न केले हे राऊतांनी सांगावे असेही राणे म्हणाले.

पाहुणे म्हणून बोलावले

पाहुणे म्हणून बोलावले, पाहुणे म्हणून या. पदाप्रमाणे द्या आणि जा. एक दोन रस्त्याला पैसे द्या. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत, त्याला पैसे द्या. वादळ, पूरपरिस्थितीच्या वेळी जाहीर केलेले पैसे द्या. दरवर्षीचे पैसे हे जुलै ते ऑगस्टमध्ये द्या, असेही राणे म्हणाले. आताचे सत्ताधारी शत्रू आहेत. जुलै ऑगस्टला पैसे देण्याची खेळी असल्याचेही राणे म्हणाले. हे सगळ भाजपचे श्रेय आहे. त्यामुळे पाहुणे म्हणून या असेही नारायण म्हणाले.