घरताज्या घडामोडीनारायण राणे म्हणाले, 'आम्हा दोघांना अडचणीत आणू नका'; वाचा नेमके प्रकरण काय?

नारायण राणे म्हणाले, ‘आम्हा दोघांना अडचणीत आणू नका’; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

कसबा पेठ निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे सांगितले गेले.

कसबा पेठ निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “असे विचारून आम्हाला दोघांना अडचणीत आणू नका”, असे नारायण राणे म्हणाले. (narayan rane talk on kasba and chinchwad by-election)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उपस्थित पत्रकरांनी निवडणुकांमध्ये ब्राह्मण समजाला डावलण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, “आम्ही बऱ्याच गोष्टीमधून बोध घेत असतो. भाजपा असा पक्षा आहे, जो दिवसेंदिवस आत्मपरिक्षण आणि सुधारणाही करतो. त्यामुळे कोणावर अन्याय झाला असेल तर, पक्ष बघून घेईल. आम्ही सुधारण्याचे काम करतो आहे. पण पत्रकार प्रश्न काढून त्यांच्या जखमेवर मीट चोळायचे काम करत आहेत”, असे नारायण राणे म्हणले.

- Advertisement -

“लाईनीत किती ब्राह्मण आहेत. कितीजण डावलून आम्ही डावलणार. मला वाटते तुम्ही पर्टीक्यूलर त्यावर येऊ नका आणि आम्हा दोघांनाही अडचणीत आणू नका”, असेही नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, कसबा पेठ निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे सांगितले गेले. हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करतानादेखील ते उपस्थित नसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले. आता महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, तर भाजप-शिंदे गट महायुतीकडून हेमंत रासने रिंगणात आहेत, पण यात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे तो ब्राह्मण समाजामुळे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली.

- Advertisement -

त्यानंतर आता मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने येथील ब्राह्मण समाजाने जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत झळकले होते.


हेही वाचा – वारीशे हत्या प्रकरण : राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोचा उदय सामंतांकडून खुलासा, म्हणाले – ‘खाणेरडं राजकारण’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -