घरताज्या घडामोडीडाव्या उजव्यांनी बोलू नये, उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचे थेट आव्हान

डाव्या उजव्यांनी बोलू नये, उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचे थेट आव्हान

Subscribe

कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो दैवताचे स्मारक असो, विरोधाची भाषा करू नये, भावनेचा विचार करावा, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आज सुनावले. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाल्यानंतर नारायण राणे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. कोणाला काही वाटत असेल तर स्वतः बोलाव, डाव्या उजव्यांनी बोलून काही फायदा नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेकडून स्मारकाच्या भेटीला झालेल्या विरोधाचा समाचार घेतला. जशाच तस उत्तर देण्यात मी प्रख्यात आहे. त्यामुळे कोणीही मांजरीसारख आडव येऊ नये, असेही राणे म्हणाले.

नारायण राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देणार हे कळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी नारायण राणे यांना स्मृतीस्थळाला भेट देण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. राऊत यांच्या वक्तव्याचाही समाचार नारायण राणे यांनी घेतला. डाव्या उजव्यांनी बोलू नये, ज्यांना बोलायचे आहे त्यांनी थेट बोलावे, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांना काही वाटत असेल तर त्यांनी स्वतः बोलाव असेही नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले. त्यामुळेच शिवसेनेला संपुर्ण जन आशीर्वाद यात्रेत शिंगावर घेण्याची तयारी करूनच नारायण राणे हे संपुर्ण यात्रेच्या दौऱ्यात आक्रमक दिसले.

- Advertisement -

नारायण राणे यांनी मुंबईत दाखल होताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला होता. उद्धव ठाकरे हे राज्याला नावाप्रमाणेच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली होती. या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळेच येणाऱ्या मुंबई महापालिकेत गेल्या दोन वर्षांच्या अधोगतीला कारणीभूत सरकारला जनता उत्तर देईल, असेही राणे म्हणाले. तसेच आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महापालिकेतील शिवसेनेची सत्ता जाईल असेही राणे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीला नाकारत लवकरच भाजपची सत्ता येणार आहे, अशीही प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.


हे ही वाचा – मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं? राणेंचा सवाल

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -