पुणे : केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण राजकारणात कसे मुरलेलो आहोत, हे पत्रकारांना दाखवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व पदे मला मिळाली आहेत. शेवटचं पद दिल्लीला आहे, असे नारायण राणेंनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले. नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांनंतरची अपेक्षा नारायण राणेंनी सांगितली की, अन्य पदाची इच्छा व्यक्त केली, अशा चर्चेला उधाण राजकीय वर्तुळात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या मंत्री दोन समाजात झुंज लावू नये, असे वक्तव्य नारायण राणेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासंदर्भात केले आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणेंना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यासंर्भात प्रश्न विचारल्यावर ते त्या पत्रकारावर चिडत म्हणाले, कोण आहे? मी त्यांना ओळखत नाही? त्यांचा जाती आणि आरक्षणाचा अभ्यास करावा. आरक्षण घटनेच्या कोणत्या कलमाने द्यावे. हे त्यांना विचारून या ना? ते अजून वयाने लहान आहेत. मला राजकारणात बरीत वर्षे झाली आहेत. मला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व पदे मिळाली आहेत. आता शेवटचे पद दिल्लीला आहे”, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Riots : प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे – Narayan Rane
मराठा आरक्षणसंदर्भात प्रत्येक नेत्यांची वेगळी मागणी
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मनोज जरांगे पाटील यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे, या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, “यासंदर्भात मला काही माहिती नाही. मराठा आरक्षणसंदर्भात प्रत्येक नेत्यांची वेगळी मागणी आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षणला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जावे. 52 टक्क्यावर भारतीय घटनेच्या 15(4)प्रमाणे आरक्षण द्यावे आणि ते मागासवर्ग आयोगाकडे पाठवावे. सर्वेही व्हावा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे मत नारायण राणेंनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – NCP Crisis : अजितदादांवरील भेकड शब्दप्रयोगावर तटकरेंकडून सडेतोड उत्तर; शरद पवार गटाने विचारले 10 प्रश्न
नारायण राणेंचा अल्पपरिचय
नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. नारायण तातू राणे यांचा जन्म 10 एप्रिल 1962 मध्ये मुंबईत झाला आहे. नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झालीय. 1999 मध्ये नारायण राणेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. नारायण राणेंनी राज्य सरकारमध्ये बंदर, उद्योग आणि स्वयंरोजगार यासारखे कॅबिनेट मंत्री पदे भूषविली आहे. 2005 मध्ये विधानसभेचे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. यानंतर नारायण राणे हे काँग्रेसमध्ये सामील झाले होते. यानंतर 2019मध्ये त्यांनी भाजपला प्रवेश केला. यानंतर नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन केला.