घरताज्या घडामोडीदिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा

दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा

Subscribe

राणेंच्या पाठी लागू नका, नाही तर मी आता थोडं बोलतोय. अन्यथा सर्वच बोलावं लागेल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता नारायण राणे आक्रमक झाले असून शिवसेनेवर तीव्र शब्दात वार करत आहेत. तसेच अनेक आरोप नारायण राणेंनी उघड उघड केले आहेत. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सगंळ बोललो तर परवडणार नाही असा थेट इशारा राणेंनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी अधिकारी आणि पोलिसांनाही सज्जड दम भरत कायद्याने वागण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेता सुशांत सिंघ राजपूत प्रकरणावर बोट ठेवून पुन्हा एकदा शिवेसना आणि महाविकास आघाडीवर नारायण राणे यांनी चौकशीवर आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत जन आशीर्वाद यात्रा पुर्ण करुन माध्यमांशी संवाद साधला आहे. नारायण राणेंनी अटकेच्या कारवाईमुळे आता शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नारायण राणे टप्प्या टप्प्यानं जुन्या प्रकरणांचा जाहीर खुलासा करत आहेत. यावेळी नारायण राणेंनी अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध करत मी कुठलाही गुन्हा केला नाही म्हटलंय. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मात्र काही हरकत नाही आम्ही विरोधी पक्षात असून काय विरोधी राहणार नाही. भविष्यात आमची सत्ता येईल त्यामुळे अधिकारी आणि पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला समोरं जावं लागेल असा दम नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांनाही दिला आहे.

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या, दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सगळं बोललो तर परवडणार नाही. दिशा सालियानच्या प्रकरणातील आरोपी मिळाले नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागलात तर सगळं बोलावं लागेल अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

मी क्रिमिनल तर मंत्री कसा ?

जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असे सवाल राणेंनी केले आहेत. आता मोदीनी मंत्रिपद दिलंय मात्र पहिलं मंत्री यांनीच केले आहे. तेव्हा कोणी विरोध करायला नव्हते. तसेच जेव्हा साहेबांना दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडण्यास सांगितले होते. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नव्हते असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

माझ्या पाठी लागू नका

माझ्या पाठी लागू नका असा दम नारायण राणे यांन विरोधकांना दिला आहे. राणेंच्या पाठी लागू नका, नाही तर मी आता थोडं बोलतोय. अन्यथा सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या घरासमोर आलेले चिव सैनिक त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्कार केला. काय सत्कार केला.. सरदेसाई साहेबांनी, चोप चोप चोपलं पोलिसांनी… असो थोडं थोडं काढूया एकाचवेळी अनेक ब्रेकिंग न्यूज नको असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? नारायण राणेंवर विनायक राऊतांचा पलटवार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -