Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य; नारायण राणेंची रायगड पोलिसांसमोर हजेरी

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य; नारायण राणेंची रायगड पोलिसांसमोर हजेरी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेत हजर राहणार आहेत. मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानाहून नारायण राणे आत्ता पावणेबाराच्या सुमारास अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणातून नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांची सशर्त जामिनीवर सुटका केली. जामिनावर बाहेर येताच नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेत भेट देणे अपेक्षित होते, मात्र ते दिल्लील रवाना झाला. राणे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महाडच्या गुन्हे शाखेकडे सूपुर्द केले. त्यामुळे ३० ऑगस्टला त्यांनी हजेरी लावली नाही. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी राणेंच्या जुहू निवासस्थानी भेट घेत यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. राणे यांना महाड प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर करताना महिन्यातून दोन वेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहण्याची अट घातली होती. मात्र दोन वेळा त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत हजेरी लावली नाही. मात्र आज अटक आणि सुटका प्रकरणानंतर नारायण राणे पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आज या प्रकरणासंदर्भात राणे य़ांना लेखी जामीन नोंदवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलिस फाटा तैनात करण्य़ात आला आहे. जवळपास २०० मीटर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र यावेळी पत्रकारांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. मुंबई, नाशिक, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमधील भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यामुळे ठाकरे-राणे यांच्यातील राजकीय मतभेद पुन्हा जगजाहीर झालेत.


झेडपीच्या निवडणुका ओबीसी V/S ओपन अशा होणार नाहीत, अन्यथा महागात पडेल, वडेट्टीवारांचं मोठं विधान


- Advertisement -

 

- Advertisement -