घरमहाराष्ट्रNarayan Rane : "त्यांनी पाय ठेवला म्हणजे...", पंतप्रधान मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर नारायण...

Narayan Rane : “त्यांनी पाय ठेवला म्हणजे…”, पंतप्रधान मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेकडून यासाठीची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. याबाबतची पत्रकार परिषद आज नारायण राणे यांच्याकडून घेण्यात आली.

सिंधुदुर्ग : देशभरात 4 डिसेंबर हा दिवस हा नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचा नौदल दिवस हा महाराष्ट्रात आणि तो ही मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे,. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये यासाठीची विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. या नौदल दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम उद्यापासून करण्यात येणार आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. याबाबत आता अधिकची माहिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. (Narayan Rane’s reaction to PM Narendra Modi’s Sindhudurg visit)

हेही वाचा – एकेकाळचे कट्टर शत्रू, सध्याचे राजकीय मित्र; दीपक केसरकर चक्क नारायण राणे यांच्या घरी

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेकडून यासाठीची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही. राज्य सरकार आणि नौदल मिळून या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत. नियोजन झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ. तसेच, यावेळी प्रसार माध्यमांनी नारायण राणेंना विचारले की, पंतप्रधानांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कोकणला काय फायदा होईल? यांवर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, 24 तारखेला येथे एक दौरा झाला. त्याचा काय फायदा झाला?, हा टोला त्यांनी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना लगावला. कारण आदित्य ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी अंगणात (कोकणातील खळा) संवाद साधला. त्यांनाच नारायण राणे यांच्याकडून टोला लगावण्यात आला.

तसेच, जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा सिंधुदुर्गचा विषय निघेल तेव्हा आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो की, तुम्ही आला होता त्याच भागाबद्दल बोलत आहोत. येथे पर्यटन आणायचे आहे, इतरही अनेक गोष्टी करायच्या आहेत. पंतप्रधान सिंधुदुर्गात आले किंवा त्यांनी पाय ठेवला म्हणजे काहीतरी द्यायलाच पाहिजे असे काही नाही. तशी आमची, भाजपाची किंवा जनतेची मागणी नाही. पत्रकारांची तशी काही इच्छा असेल तर पंतप्रधान आल्यावर तुम्ही त्यांना सांगा. उगाच कुठेतरी चांगल्या वातावरणाला कलाटणी देऊ नका, असेही नारायण राणे यांच्याकडून पत्रकारांना बजावण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -