मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

96व्या साहित्य संमेलनासाठी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला घेण्यात येणार आहे

narendra chapalgaonkar
narendra chapalgaonkar

नागपूरः 96 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाची धुरा नरेंद्र चपळगावकर यांच्या हाती देण्यात आली आहे. वर्धा येथे आगामी मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून, मोठ्या प्रमाणात साहित्यिक जमा होणार आहे.

वर्ध्यात आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, त्या बैठकीत 96व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 96 वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. परंतु 96व्या साहित्य संमेलनासाठी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र चपळगावकर यांनीसुद्धा मंडळाचे आभार मानले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांच्याबद्दल आपलं मत मांडण्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल निवड करणाऱ्या सगळ्यांचे महामंडळाचे आणि सर्व साहित्य संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो, मला या संधीमुळे मराठीची मी आणखी काय सेवा करायला पाहिजे, यांचंही स्मरण करून देण्यात आलेलं आहे, असं मानून मी या सन्मानाचा स्वीकार करतो, असंही नरेंद्र चपळगावकर म्हणाले आहेत.

कोण आहेत नरेंद्र चपळगावकर?

नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील आणि सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते वर्ष १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३ नोव्हेंबर २००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात. चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात.


हेही वाचाः अरे, मी दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर मला अटक करा; केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल