घरमहाराष्ट्रदाभोलकर हत्याप्रकरण : ४ आरोपींविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत खटला चालवणार, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

दाभोलकर हत्याप्रकरण : ४ आरोपींविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत खटला चालवणार, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Subscribe

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील (Narendra Dabholkar Murder Case) पाच आरोपींपैकी ४ आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत (UAPA Act) खटला चालवण्यास न्यायालयानं मान्यता दिली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दाखल केलेल्या दोषारोपत्रात पाच आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.

दाभोलकर हत्या प्रकरणातील विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे या चार आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. तर या प्रकरणातील पाचवा आरोपी सनतान संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याच्या विरोधात पुराव्यांची छाननी करुन त्यांच्याविरोधात कोणत्याही कलमांतर्गत खटला दाखल करता येईल हे निश्चित केलं जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे.

- Advertisement -

न्यायालयाने या आरोपींविरोधात यूएपीए, हत्या आणि हत्येचा कट रचणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असं आरोप निश्चित करण्याची ऑर्डर काढण्यात आली आहे. यावर आरोपींनी न्यायालयाला वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने आरोपींना आठवड्याभराचा वेळ दिला आहे. तर पाचवे आरोपी संजीव पुनाळेकर याच्याविरोधात सध्यातरी पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली खटला चालेल. तसंच, इतर पुराव्यांची छाननी करुन आणखी कोणत्या कलामांखाली खटला दाखल करता येईल हे निश्चित केलं जाईल, असं न्यायालयाने म्हटलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -