घरमहाराष्ट्रशरद कळसकरला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

शरद कळसकरला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

Subscribe

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातला आरोपी शरद कळसकरला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसरकरची पोलीस कोठडी संपल्यानंतर सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. आज दुपारी सीबीआयने कळसरकरला पुण्याच्या शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयाने त्याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआयची कोठडी सुनावली आहे. कळसकरला दाभोलकर हत्या प्रकरणात अधिक माहिती असून सविस्तर तपास करण्यासाठी त्याच्या अधिक चौकशीची गरज असल्याचा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी केला.

- Advertisement -

सीबीआयला कळसरकचा ताबा मिळवण्यात यश

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरचा ताबा मिळवण्यात सीबीआयला अखेर यश आले. एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे मुंबई हायकोर्टाने सोमवारी मान्य केले. या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने शरद कळसकरची रवानगी सीबीआय कोठडीत केली. त्यामुळे आता सीबीआयला आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करता येणार आहे.

कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या

आरोपी शरद कळसकर याला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनी गोळ्या झाडल्याचा सीबीआयचा दावा आहे. सचिन अंदुरेला सीबीआयने अटक करुन चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. शरद कळसकर याचा ताबा सीबीआयला मिळाला असला तरी सचिन अंदुरे याला मात्र पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -