Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनरेंद्र मोदी अन् आदित्य ठाकरेंचा ब्रॅण्ड एकच; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

नरेंद्र मोदी अन् आदित्य ठाकरेंचा ब्रॅण्ड एकच; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित भाजपा नेत्याचा एक फोटो ट्वीट करत महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे शीर्षक देत भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊतांच्या या ट्वीटला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंचा एक फोटो ट्वीट करत संजय राऊत यांना सवाल केला की, आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की आहे? भाजपाच्या या प्रश्नाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Narendra Modi and Aditya Thackeray brand is one Sanjay Raut targets the Prime Minister Macau casino)

भाजपाने ट्वीट केलेल्या आदित्य ठाकरेंच्या फोटोबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जो फोटो पोस्ट केला आहे तो नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा. मोदींचे असे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच ब्रॅण्ड आदित्य ठाकरे पित होते. पण हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. इतक्या डरपोक लोकांच्या हातात ईडी आणि सीबीआय आहे, म्हणून यांच्यातली मर्दांगी जागी झाली आहे. या दोन एजन्सी आणि पोलीस यांच्या हातात नसतील ना तर यांच्यासारखे डरपोक लोकं नाहीत. टोळधाडवाले मला धमक्या देत आहेत, हिंमत असेल तर या समोर उगाच तोंडपाटीलकी करू नका, कधी यायचं सांगा, असे आव्हान संजय राऊत यांना भाजपाला दिले.

- Advertisement -

भाजपाला अंगावर घेण्याची गरज नव्हती

संजय राऊत म्हणाले की, मकाऊला मी सुद्धा गेलो आहे. खूप वर्षांपूर्वी मकाऊची जेव्हा उभारणी सुरू होती. तेव्हा एक गाव कसं उभं राहतं हे मी पाहिलं आहे आणि सामनात त्यावरती लिहिलं आहे. पण आपण जबाबदार लोकं आहोत आणि महाराष्ट्रात काय चाललं आहे, हे माहित असतानाही तुम्ही तिथे जाऊन इथे येता आणि विरोधकांना ज्ञान देता. खरं तर भारतीय जनता पक्षाला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी सांगतो आहे की, त्या फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटी रुपयांचे पोकर्स विकत घेतले. पोकर्स ही करन्सी आहे, ते मला नंतर कळलं. त्याच्यासमोर पिझ्झा नाही, पोकर्स आहे, हे मला सांगितलं गेलं. त्याच्यसोबत आणखी लोकं होते. त्यांनीसुद्धा दोन-तीन करोडचे पोकर्स खरेदी केले. जर भाजपा सांगते की हे आमचे नेते आहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील, देशातील जनतेला नाही पण तुमच्या लोकांना चांगले दिवस आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -