Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

Subscribe

पालखी मार्गासाठी 11 हजार कोटींचा निधी देणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचं उपस्थित लोकांना टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेल्या वैष्णव सभेत केलेल्या भाषणामुळे उपस्थित वारकरी मंडळी मंत्रमुग्ध झाले. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींचा निधी रस्ता पालखी मार्गासाठी देणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचं उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. (Narendra Modi assures Warkaris to spend more than Rs 11,000 crore for palakhi routes)

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

- Advertisement -

श्री विठ्ठलाय नमः म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींच्या महामार्गाची घोषणा केली. ते म्हणाले की, पालखी मार्गातील २ राष्ट्रीय राजमार्ग चारपदरी करण्याची संधी मला मिळाली. श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ५ टप्पांत होईल. तर, तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यांत होईल. या सातही टप्प्यांतून ३५० किमीचा महामार्ग बनवण्यात येईल. यासाठी ११ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे क्षेत्रविकासाला गती मिळेल.

यावेळी त्यांनी देहूतील शिळा मंदिराची महती गायली. ते म्हणाले की, देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे.

- Advertisement -

आणखी वाचा Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दिशेने रवाना 

संतांचा सहवास लाभणं मनुष्यासाठी दुर्मिळ आहे. संतांची कृपा झाली म्हणजे देवाची कृपा झाली असं म्हटलं जातं. आज देहूच्या या पवित्र तीर्थ भूमीवर येत मला ही अनुभूती होत आहे. भारत शाश्वत आहे कारण भारत ही संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात देश आणि समाजाला दिशा देण्याकरता कोणी ना कोणी महत्त्मा जन्माला आला. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करत आहे.

शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत केंद्र

या शिळेवर तुकाराम महाराांनी १३ दिवस तपस्या केली असेल. ती शिळा फक्त शिळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शिळा आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे. प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सत्परुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधींचे ७२५ वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. बहिणाबाईंनी संत तुकारामांना संतांचे कळस म्हटले आहे.


ते पुढे म्हणाले की, आपण आपल्या प्राचीन परंपरा जिवंत ठेवल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विकास आणि वारसा एकत्रपणे पुढे केले पाहिजे.

हेही वाचा – मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार

तुकारामांच्या अभंगांनी प्रेरणा दिली

तुकारामांनी दुष्काळ पाहिला, दुख पाहिले, भूकबळी पाहिले. संत तुकाराम त्यावेळी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठी प्रकाश म्हणून राहिले. ही शिळा त्यांच्या वैराग्याची साक्ष आहे. तुकराम यांच्या अभंगात दया आणि करुणेचा ठेवा आहे. या अभंगांनी पिढ्यांन् पिढ्या प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय, त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभंग गाथांनी संत परंपरेचे ५०० अभंग रचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.

जे का रंजले गांजले…

संत तुकाराम म्हणत उच्च-नीच माणनं हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा लाभ विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे.

सर्व पिढीला प्रेरणा मिळाली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळ्या पिढीला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, या यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यात ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत.

प्रसाद योजना

अयोध्येत राममंदिरही होते आहे. काशी विश्वनाथ स्वरुप बदलले आहे. सोमनाथमध्येही चांगले कार्य झाले आहे. प्रसाद योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांचा विकास केला जातोय. रामायण सर्किट, बाळासाहेब आंबेडकर पंचतीर्थांचाही विकास होतो आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे.. योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. गरिबांसाठी योजना सरकार राबवते आहे. १०० ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत. पर्यावरण, जलसंवर्धन, नद्यांसाठी प्रयत्न, स्वस्थ भारत हा संकल्प १०० टक्के पूर्ण करायचे आहे.

योगदिन उत्साहात साजरा करा

सगळ्यांच्या सहभागाची गरज आहे. प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, नदी-तलावे साफ करण्याचा संकल्प केला तर देश स्वच्छ राहिल. अमृत सरोवरासाठी संतांनी मदत करावी. प्राकृतिक शेतीला मोहीम म्हणून पुढे नेतो आहे. प्राकृतिक शेती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. योगदिन येतोय, हे संतांचेच देणे आहे. योग दिवस उत्साहाने साजरा कराल. जय जय रामकृष्ण हरी.. हर हर महादेव

मोदींनी केले सर्व संतांचे नामस्मरण

संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत कबिर, संत सोपान देव, संत मुक्ताई अशा महाराष्ट्रातील सर्व संतांचं नामस्मरण यावेळी मोदींनी केलं.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -