पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असणार दौरा

Narendra Modi on Maharashtra tour today

पुणे जिल्ह्यातील मंदिरांचे शहर देहू मोंदींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. ते संत तुकाराम महाराज मंदिर येथे शीळा मंदीर आणि मुर्तीचे लोकार्पण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 1 वाजता देहु येथे येणार आहेत.यावेळी ते देहु येथे आयोजीत सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर ते मुंबई येथील राजभवनात जल भूषण भवन आणि क्रांतिकारी गैलरीचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दैनीक समाचारच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या कार्यकाळात राजभवन येथे एक भूमिगत जागा मिळाली होती. या जागेत क्रांतिकारी गैलरी स्थापन केली गेली आहे. येथे चाफएक बंधुंसह सावरकरांचे चित्र प्रदर्शित केले गेले आहे. केंद्र आणइ राज्य सरकारमधील तनावात बऱ्याच कालाबधी नंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. त्यावेळी आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव नसल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते.

मंदीराला 1 कोटी खर्च –

देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख नितीन मोरे यांनी सांगितले की, भक्तांच्या देणगीतून एक कोटी रुपये खर्चून हे ‘शिला’ मंदिर बांधण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. मंदिर बांधायला सहा वर्षे लागली. नितीन मोरे यांनी सांगितले की, मंदिरात एक खडक असेल ज्याला वारकरी संप्रदाय वारी या वार्षिक यात्रेचा प्रारंभ बिंदू मानतो. वारीची सांगता पंढरपूरला होते.

मुख्यंत्री उद्धव ठाकरे राहणार नाहीत उपस्थित –

मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचे भाजप नेते महेश लांडगे यांनी सांगितले. लांडगे म्हणाले, या मंचावर राजकीय भाषण होणार नाही. हे वारकऱ्यांबद्दल अधिक असेल, कारण 20 जूनपासून देहू येथून वारी सुरू होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर असणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार नाहीत.