मुंबई : आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मतं आणि सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आजच्या निकालावरून महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तब्बल 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे 132 जागांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला राज्यात फक्त 45 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राने तृष्टीकरणाचा सामना कसा करायचा ते दाखवून दिले असे ते म्हणाले आहेत. (PM Narendra Modi Reaction On Maharashtra Assembly Election Wins Mahayuti.)ॉ
हेही वाचा : Assembly Election 2024 : जयंतराव अन् विश्वजित कदम ठासून नाही घासून निवडून आले; सांगलीत युतीचेच वर्चस्व
आज महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज राज्यातील खोटेपणाचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाल्याचे दिसून आले, असेही ते म्हणाले आहेत. ज्यांनी विभाजनाचा प्रयत्न केला त्यांचा दारूण पराभव झाला आहे. तसेच महाराष्ट्राने विकसित भारताच्या संकल्पाला आणखी मजबूत केले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपा आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे कौतुक देखील यावेळी त्यांनी केले आहे.
हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : मुंबईत विद्यमान आमदारांचीच चलती, भाजपाचा प्रभाव कायम़़
मधील काही काळात काही लोकांनी आम्हाला धोका दिला तसेच राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत मोदींनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांंच्यावर टीका केली आहे. राज्यातील पोटनिवडणुकीचे देखील निकाल लागले आहेत. लोकसभेत आमची आणखी एक सीट वाढल्याचे ते म्हणाले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपला खूप सपोर्ट केला आहे. आसामने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील आम्हाला यश मिळाले आहे. बिहारमध्ये देखील आमचं समर्थन वाढले आहे. यावरून एक लक्षात येते की देशाला आता फक्त विकास पाहिजे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेवर अधिक वेगाने धावेल असे अश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar