घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Award: लता मंगेशकर पुरस्कार जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या...

Lata Mangeshkar Award: लता मंगेशकर पुरस्कार जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा शेवटचा पुरस्कार…

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडणार आहे.

या वर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

लता मंगेशकर पुरस्कार जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा पुरस्कार आहे. नरेंद्र मोदी ही दिग्ग्ज व्यक्ती आहे. ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे आहेत. त्यामुळे मोदींनी या पुरस्कारासाठी हो म्हणावं हीच मोठी गोष्ट आहे. माझा मुलगा आदिनाथ मंगेशकरने खूप प्रयत्न केले आणि त्यांचा होकार मिळाला. त्यानंतर मोदींनी हा पुरस्कार स्वीकारला. मात्र, मी असे पुरस्कार घेत नसतो. पण हा आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरस्कार असेल, असं पीएम मोदींनी म्हटल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मंगेशकर कुटुंबीयांकडून हा पुरस्कार दिला जातो. परंतु भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रीत्यर्थ या वर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे आणि तो दरवर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनी प्रदान केला जाणार आहे.

- Advertisement -

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विान मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.


हेही वाचा : उत्तरसभेच्या वेळेआधीच राज ठाकरे लावणार ठाण्यात हजेरी, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज राहण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -