घरमहाराष्ट्रनरेंद्र मोदी विश्वगौरव, युगपुरूष...; चंद्रशेखर बावनकुळेंकडून पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

नरेंद्र मोदी विश्वगौरव, युगपुरूष…; चंद्रशेखर बावनकुळेंकडून पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

Subscribe

इंदापूर – देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता संबोधलं होतं. आता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदींना विश्वगौरव युगपुरूषाची उपमा दिली आहे. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबत मोदींची तुलना करू नका, असा सज्जड दमच त्यांनी भरला आहे. ते आज इंदापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यावर बावनकुळे म्हणाले, समाजात वैर निर्माण…;

- Advertisement -

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. माझ्या वडिलांच्या नावाने मते मागण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागवून दाखवा. ठाकरेंच्या या आव्हानावरूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. कुठं सूर्य आणि कुठे तुम्ही? ते मोदींवर बोलतात. मोदींची बरोबरी तरी करू शकतात का? विश्वगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कशाला वल्गना करता? बघा तुम्ही 2024 ला काय होतंय ते पाहा?, असा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांच्यावर एका रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. भ्रष्टाचाराच्या बाजूला तुम्ही आहात. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणारे तुम्ही आहात. सत्तेतून पैसा मिळवायचा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धर्म आहे, त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलणं किंवा भ्रष्टाचाराची भाषा करणं तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही भ्रष्टाचार केलाय. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. आम्ही नाही आणि तुमच्या बाजूला जे बसलेत तेही भ्रष्टाचारी आहेत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

- Advertisement -

माझ्या कुळाचा उल्लेख करून त्यांना आनंद मिळतो. त्यांनी खुशाल माझ्या कुळाचा उल्लेख करावा. परंतु, पुढे काय होतंय ते पाहाच. त्यांच्याकडे जे उरले सुरले आहेत, तेही आमच्याकडेच येतील. आम्ही हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आहोत. हिंदुत्त्वासाठी काम करतो, असंही बावनकुळे पुढे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -