नगरच्या सभेत मोदींनी घातलेला पैठणी फेटा येवल्याचा !

महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याला विवाह,सण,उत्सव अशा शुभकार्यात महत्त्वाच स्थान दिलं जातं. या फेट्याच्या प्रेमात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदीही पडले.

srikant khandare with modi

अहमदनगर येथील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये आले आहेत. त्यावेळी मोदींनी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. पण यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते मोदींनी घातलेल्या फेट्याने. सभा जरी अहमदनगरमध्ये सुरू असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेला तो खास फेटा मात्र येवल्यातून आला होता.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याला विवाह,सण,उत्सव अशा शुभकार्यात महत्त्वाच स्थान दिलं जातं. या फेट्याच्या प्रेमात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदीही पडले. त्यामुळेच की काय मोदींनी अहमदनगरच्या सभेसाठी येवल्याच्या खास पैठणीचा फेटा घालण्याला प्राधान्य दिलं.

हा फेटा आहे येवल्याच्या श्रीकांत खंदारे यांचा. श्रीकांत खंदारे यांनी मोंदीना फेटा बांधण्यासाठी सकाळीच अहमदनगर गाठले. नगरच्या या सभेविषयी फेटट्याचे निर्माते श्रीकांत खंदारे अनेक दिवसांपासून उत्सुक होते. आज सकाळपासूनच ते पंतप्रधान नरेंद्र फेटा बांधण्यासाठी नगर शहरात हजर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

श्रीकांत खंदारे यांचे येवल्यामध्ये ‘खंदारे फेटा’ नावाने प्रसिध्द दुकान आहे. या  आधी श्रीकांत खंदारे यांनी अनेक दिग्गजांना आपल्या खास पैठणीचे फेटे बांधले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या आधी अनेक कार्यक्रमात खंदारे यांचा फेटा बांधला होता.