घरमहाराष्ट्रनरेश म्हस्केंचा आव्हाडांना सवाल; अजित पवारांच्या फोटोला काळे फासण्याचे सांगणे गद्दारी की...

नरेश म्हस्केंचा आव्हाडांना सवाल; अजित पवारांच्या फोटोला काळे फासण्याचे सांगणे गद्दारी की खुद्दारी ?

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांनी मला फोन करुन अजित पवारांचे पुतळे जाळा आणि फोटोला काळे फासा असे सांगितल्याचा आरोप म्हस्केंनी केला आहे. आव्हाड हे प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचेही ते म्हणाले. 

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम केले, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( यांनी केली होती. त्यांना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मला फोन करुन अजित पवारांचे पुतळे जाळा आणि फोटोला काळे फासा असे सांगितल्याचा आरोप म्हस्केंनी केला आहे. आव्हाड हे प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर टीका केली की, प्रसिद्धी मिळते त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीत राहाण्यासाठी अशी विधाने करत असतात, असे म्हस्केंनी म्हटले आहे. ठाण्यात माध्यमांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पाहटेचा शपथविधी केला होता. तेव्हा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते यांना घेऊन जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या प्रतिमेला काळे फासले होते. त्यांचा पुतळा जाळला होता. त्यावेळी त्यांनी (जितेंद्र आव्हाड) मलाही फोन करुन अजित पवारांचे पुतळे जाळा, त्यांच्या प्रतिमेला काळे फासा असे सांगितले होते. आव्हाडांची ही गद्दारी आहे की खुद्दारी, असा सवाल नरेश म्हस्केंनी विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उगाच बोलायला लावू नका…, जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्वीटरवॉर

काय म्हणाले होते आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला होता. मुख्यमंत्री कुठे ही गेले की सहा महिन्यांपूर्वी आम्ही असेच केले होते, अशी शेखी मिरवतात. क्रिकेटच्या कार्यक्रमात गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच फटकारे मारेले होते. कबड्डीच्या कार्यक्रमाला गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेचे पाय खेचले होते, खो-खोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले की मुख्यमंत्री म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच खो दिले होते, असे सांगत आव्हाड म्हणाले होते, सहा महिन्यांपूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला होता. ही टीका शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाण्यातील राजकीय वातावरण तापले, नरेश म्हस्के काय म्हणाले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -