घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत, शिंदे गटाचा अजित पवारांवर पलटवार

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत, शिंदे गटाचा अजित पवारांवर पलटवार

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केल्यानंतर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत असल्याचं म्हणत शिंदे गटाने अजित पवारांवर पलटवार केला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री होता आलं नाही असं म्हटलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील फार मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्या आयुष्यात एकदा ही संधी चालून आली होती. मात्र, राष्ट्रवादीचे जास्त संख्येने आमदार असतानाही मोठ्या पवारसाहेबांनी ती संधी काँग्रेसला दिली. त्यानंतर त्यांनी एकदा पहाटे शपथविधी करून उपमुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पवारांनी त्यांचा डाव उलटवून टाकला. त्यामुळे मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत त्यांच्या मनात आहे असं वाटतं, असं नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. त्यामुळे अजित पवारांनी श्रद्धेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच हेतूने त्यांनी टीका केली, असा आरोप म्हस्के यांनी अजित पवारांना लक्ष्य करताना केला.

अजित पवार काय म्हणाले?

- Advertisement -

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे. आता त्याला काय करायचं? जनतेनेच बघावं आता काय चाललंय आणि काय नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

आधीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाही. आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.


हेही वाचा : मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -