Homeमहाराष्ट्रPolitics : श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रश्न, पण नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंवर...

Politics : श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रश्न, पण नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंवर निशाणा

Subscribe

उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी स्वत: दिले आहे. मात्र त्यानंतर चर्चा होताना दिसत आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता येत्या 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? गृहखातं कोणाकडे जाणार? यांसारख्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्रे खासदार श्रीकांत शिंदे हे उपमुख्यंमत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे आणि तशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण मी उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी स्वत: दिले आहे. मात्र त्यानंतर चर्चा होताना दिसत आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Naresh Mhaske targets Aditya Thackeray after asking about making Shrikant Shinde the Deputy Chief Minister)

माध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्केंना खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नावर ते म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा काहीही संबंध नाही. तसेच श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही. काल एकनाथ शिंदे यांनीही ते जाहीर केलं आहे. पण तुम्ही जर आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात तुलना करत असाल, तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते केंद्रात मंत्रीपद घेऊ शकले असते. परंतु पक्षातील वरिष्ठ खासदाराला त्यांनी मंत्रीपद दिलं आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण नरेश म्हस्के यांनी दिले.

हेही वाचा – Politics : राजा हा राजा असतो; कोल्हापुरात सतेज पाटलांच्या समर्थकांची बॅनरबाजी

गृहमंत्रीपदाबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही

दरम्यान, आज महायुतीच्या नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होणार आहे. या बैठकीत गृमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत काही निर्णय होईल, असे वाटते का? या प्रश्नावर नरेश म्हस्के म्हणाले की, महायुती भक्कम आहे आणि आमच्यात गृहमंत्रीपदावरून कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. एकनाथ शिंदे यांनीही काल यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा गृहमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय घेतील त्याच्याशी सहमत आहोत, हे आम्ही आधीच जाहीर केले आहे, असे मतही नरेश म्हस्के यांनी मांडले.

हेही वाचा – Shiv Sena UBT : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन


Edited By Rohit Patil