घरताज्या घडामोडीनाशिक बस अपघात : मृत आणि जखमींची ओळख पटली; पंतप्रधान मोदींकडून 2...

नाशिक बस अपघात : मृत आणि जखमींची ओळख पटली; पंतप्रधान मोदींकडून 2 लाखांची मदत जाहीर

Subscribe

नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. बसला लागलेली आग भीषण असल्याने 11 जणांचा जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. बसला लागलेली आग भीषण असल्याने 11 जणांचा जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, संपूर्ण शरीर जळाले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र, या अपघाताची अधिक तपासणी केली असता, यामधील मृतांची आणि जखमींची ओळख अखेर पटल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik bus accident Dead and injured identified Condolences from Prime Minister Modi)

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. या बसमधून एकून 48 प्रवासी प्रवास करत होते. यामधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तसेच, “या अपघाताप्रकरणी नाशिक महापालिका आयुक्त, कलेक्टर आणि एसपी यांच्याशी माझी चर्चा झाली. अपघातात 11 जणांचा मृत्यू आणि जवळपास 38 जण जखमी झाल्याचे समजते. जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

“नाशिक येथील बस दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे”, अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल – देवेंद्र फडणवीस

नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

“सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत”, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.


हेही वाचा – नाशिक बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -