घरCORONA UPDATEटोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार! नाशकातून दोघे ताब्यात , ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार! नाशकातून दोघे ताब्यात , ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा काळाबाजार सुरु झाला आहे. दरम्यान कोरोना रुग्णांना उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यावश्यक औषधांपैकी एक असणाऱ्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकमधील गंगापूररोड परिसरातून दोघांना शाखा युनिट २ चा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान संशयितांच्या ताब्यातून एक इंजेक्शनची बाटली जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनासाठी अत्यावश्यक सेवेत मोडणारी औषधे काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचा घटना वारंवार घडत आहेत. असाच काहीचा प्रकार बुधवारी गंगापूर रोडवर उघडकीस आला. राज्य सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न करण्यात आले मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दरम्यान नाशिकचा या ठिकाणी एका रुग्णालयाबाहेर इंजेक्शन काळाबाजारात विकण्यासाठी काही संशयित येणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांचा गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली होती.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे युनिट २ चा पथकाने अन्न आणि औषध प्रशासनाचा मदतीने सापळा रचण्यात आला, यात बनावट ग्राहक बनत संशयितासोबत संपर्क करून त्याला ठरलेल्या ठिकाणी बोलवण्यात आले. यावेळी एका स्विफ्ट कारमधून संशयित प्रणव शिंदे, संकेत सावंत (२४ ते २५, पंचवटी) आले. त्यांनी बनावट ग्राहकाला मागणी प्रमाणे इंजेक्शन दिले. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचाय निरीक्षकांनी या कारमधील तरुणांना औषध विक्रीचा परवाना आहे का अशी विचारणा केली. परंतु या संशयित तरुणांकडे औषध विक्रीचा नसल्याचे उघड झाले. यावेळी पोलिसांनी कारला घेराव घालत दोघांना बेड्या ठोकल्या.

यावेळी संशयित आरोपी प्रणवची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार ६०० रुपये किंमतींचे एक इंजेक्शन पोलिसांनी मिळाले आहे, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींनी वापरलेली ३ लाखांची कार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे फोन असा समारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात सामिल अद्याप दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -