घरताज्या घडामोडीनाशिक क्रेडाई करणार बांधकाम कामगारांना कुशल व समर्थ : स्किलिंग उपक्रमाचा शुभारंभ

नाशिक क्रेडाई करणार बांधकाम कामगारांना कुशल व समर्थ : स्किलिंग उपक्रमाचा शुभारंभ

Subscribe

अनेकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासोबतच समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी स्किलिंग उपक्रमाचा म्हणजेच त्यांच्या काम करण्याच्या कौशल्य विकसित करणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार जितूभाई ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत क्रेडाई सभासदांच्या विविध बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना एका महिन्याचे प्रशिक्षण तज्ञांकडून दिले  जाईल. हे  प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय क्रेडाई तर्फे प्रशस्तीपत्रक व विद्यावेतन देखील देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, बांधकामाच्या दर्जामध्ये तेथे काम करणाऱ्या कामगारांचा मोठा वाटा असतो. या कामगारांना बांधकामाशी निगडित प्लास्टरिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशन, सेंट्रींग अशा व अनेक  बाबींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इपिक व पंजाब नॅशनल बँक यांचे सहकार्य लाभले असून ३०  कामगारां ची एक अश्या  विविध बॅचेस मध्ये शहरातील विविध बांधकाम साइटवर प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणा सोबतच कामगारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची  माहिती देखील दिली जाईल व त्या योजनांचा लाभ त्या कामगारांपर्यंत पोहोचावा यासाठी क्रेडाई मार्फत प्रयत्न करण्यात येईल.
या मुळे अनेक आर्थिक लाभ देखील या कामगारांना मिळू शकतील. या कामगारांची माहिती ही शासनाच्या श्रम विभागाला देण्यासाठी तसेच आवश्यक तो पाठपुरावा करण्यासाठी  क्रेडाई तर्फे लेबर वेलफअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून सहसचिव अनिल आहेर व  नरेंद्र कुलकर्णी या समितीचे कार्य बघणार आहेत.
नाशिक क्रेडाई करणार बांधकाम कामगारांना कुशल व समर्थ : स्किलिंग उपक्रमाचा शुभारंभ
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -