घरताज्या घडामोडीफाशीच्या डोंगरावर धक्कादायक प्रकार; झाडावर आढळले मुंडके, दुसरीकडे कुजलेले धड

फाशीच्या डोंगरावर धक्कादायक प्रकार; झाडावर आढळले मुंडके, दुसरीकडे कुजलेले धड

Subscribe

गंगापूर शिवारातील फाशीच्या डोंगरावर एका झाडाला लटकत असलेले मुंडके आढळून आले आहे. विशेष म्हणजे, झाडाजवळ कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा धड आढळून आला आहे. घटनास्थळी आढळून आलेल्या कपडे, बुट, मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हर्षल संजय सोनवणे (२५, रा.सातपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाशीच्या डोंगरावर पर्यावरण संस्थेतर्फे रविवारी (दि.२) श्रमदान केले जाते. नागरिक वृक्षारोपण व झाडांना पाणी घालत होते. त्यावेळी देवराईच्या पश्चिम बाजूस ग्लेसोरेडीया नावाच्या झाडाला एका कपड्याचे सहाय्याने लटकत असलेले मुंडके दिसून आले. याप्रकरणी नागरिकांनी गंगापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी गंगापूर पोलीस दाखल झाले. झाडाजवळ जमिनीवर कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचे धड आढळून आले. घटनास्थळी पोलिसांना तपासात कपडे, बुट, मोबाईल आढळून आला. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता मृतदेह हर्षल सोनवणे याचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी डॉक्टरांनी गळफास घेत हर्षलचा मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -