Bullock Cart Race : नाशिक-ओझरमधील बैलगाडा शर्यतीला परवानगी नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

supreme court gives conditional permission bullock cart race in maharashtra

नाशिकमध्ये ओझरमधील बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये. अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता परवानगीशिवाय शर्यत घेणारे आयोजक चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये राज्यातील बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यात आली. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली होती. काही नियम आणि अटी सुद्धा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, नाशिकमधील ओझर येथे आज बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. परंतु जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

शेतकरी बैल जोडी घेऊन नाशिकमध्ये दाखल

बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाभरातून शेतकरी बैल जोडी घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तसेच या शर्यतील थोड्याच वेळा नंतर सुरूवात देखील होणार आहे. परंतु आयोजकांनी शर्यत घेण्यासाठी परवानगी न घेतल्यामुळे आयोजक चांगलेच अ़डचणीत येण्याची शक्यता असल्याचं जिल्हाधिकारी सुरेश मांढरेंनी सांगितलं आहे.

बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडी उधळली

शेतकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ओझऱमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी २१ हजारांचं पारितोषिक देखील जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही या बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आलेली नाहीये. नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडी उधळली. बाजूला लावलेल्या गाड्यांवर बैल आदळले आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणाही जखमी झालेलं नाहीये.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पहिल्यांदाच नाशिकमधील ओझरमध्ये बैलागाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या नियम व अटीनुसार, बैलगाडा शर्यत आयोजित करण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि राज्य सरकारने केलेल्या नियमावलींचं पालन करावं लागणार आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. परंतु ओझरमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यामुळे येथील पोलीस आणि प्रशासनाने बैलगाडा शर्यत घेण्यास नकार दिला आहे. मात्र, यामुळे आयोजक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ओमिक्रॉन संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रात्री जमावबंदीचे आदेश लागू करतानाच सोहळ्यांसाठी गर्दीचे निकषही ठरवून दिलेत. त्यानुसार अधिकाधिक २५० व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी असताना, या बैलगाडा शर्यतीसाठी मात्र हजारो व्यक्ती उपस्थित होते. यात कुठेही मास्क किंवा सॅनिटायजेशनचे नियम पाळले गेले नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे आयोजक अनिल कदम यांच्याकडून बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली आहे.


हेही वाचा : Omicron Variant : अमेरिकेकडून ३८०० फ्लाईट्स रद्द, दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे