घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.९०%

नाशिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.९०%

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकल ९५.९० टक्के इतका लागला आहे. राज्यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी राज्यात 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

 नाशिक विभागात एकूण १,९८,८२९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी१,९६,७१४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १,८८,६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९० आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -