घरताज्या घडामोडीनाशिकचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचा करोनामुळे मृत्यू

नाशिकचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचा करोनामुळे मृत्यू

Subscribe

महापालिकेचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचे करोना आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. ते कॅन्सरबाधितही होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर केमो थेरपी झाली होती.

महापालिकेचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचे करोना आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. ते कॅन्सरबाधितही होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर केमो थेरपी झाली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, हळूहळू प्रकृती खालावत गेली. शनिवारी (दि. १३) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
खतीब यांचा अल्प परिचय
बिलाल खतीब यांचे मितभाषी व्यक्तीमत्व होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९२ च्या निवडणुकीत ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या काळात त्यांची विधी समितीच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती. त्यानंतर १९९७ ला ते पुन्हा निवडून आले. त्यांनी या टर्म अतिशय गाजवल्या. या काळात त्यांनी जुने नाशिक परिसरातील समस्यांवर सातत्याने प्रकाशझोत टाकला. २००७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली. तत्कालीन आमदार वसंत गीते यांचे ते निकटवर्तीय मानले जात. या पाच वर्षाच्या कार्यकाळानंतर मात्र ते राजकारणात सक्रिय नव्हते. गंगापूर रोड परिसरातील खतीब डेअरीचे ते संचालक होते. त्यांचा करोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्यानंतर खतीब डेअरीशी संबंधित अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, ग्राहकांचा या डेअरीवरील विश्वास कायम होता. बिलाल खतीब हे काही दिवसांपासून कॅन्सरने जर्जर झालेले होते. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. याच उपचारादरम्यान त्यांची करोनाची टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ठक्कर डोम परिसरात खतीब यांची प्रॉपर्टी होती. मात्र ते जुने नाशिक परिसरातील मदिना चौकात वास्तव्यास होते.

 

नाशिकचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचा करोनामुळे मृत्यू
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

2 प्रतिक्रिया

  1. ?आपलं महानगर वर्तमान पत्र चंगली महिती देत आहे ??

  2. माजी नगरसेवक बिलाल खतीब यानां भावपुर्ण श्रद्धांजली ??????

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -