घरताज्या घडामोडीमाजी नगरसेवक मधुकर मते यांचे पुत्रापाठोपाठ कोरोनाने निधन

माजी नगरसेवक मधुकर मते यांचे पुत्रापाठोपाठ कोरोनाने निधन

Subscribe

तीन दिवसांपूर्वीच मोठ्या मुलाचे कोरोनाने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर माजी नगरसवेक मधुकर मते (वय ७८) हे धक्का पचवू शकले नाहीत. पूत्र विरहाने मंगळवारी (दि. २२) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावरही कोरोनाचे उपचार सुरु होते. आडगाव येथील प्रगतीशील शेतकरी असलेले मधुकर पुंजा मते यांनी सन २००२ ते २००७ या कालावधीत राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून काम बघितले. त्यांच्या कार्यकाळात आडगाव येथील दोन मजली शाळेच्या इमारतीचे काम झाले. तसेच धात्रक फाटा येथील जलकुंभही मते यांच्या प्रयत्नानेच उभा राहिला. याशिवाय रस्ते, आरोग्य, विद्युत व्यवस्थेसह अनेक छोटेमोठे कामे त्यांच्या कार्यकाळात झालीत. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले, सुना,नातवंडे आहेत. त्यांचे जेष्ठ चिरंजीव वसंत मते यांचे तीन दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झाले होते. त्यानंतर मधुकर मते यांचेही करोनाने निधन झाले.

माजी नगरसेवक मधुकर मते यांचे पुत्रापाठोपाठ कोरोनाने निधन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -