घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर

नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर

Subscribe

नाशिकमध्ये सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. नाशिकच्या त्रंबकेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरण ७५ टक्के भरले. या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.

नाशिमध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीची ओळख असलेल्या दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी लागलाय. तर नदी पात्रातील लक्ष्मण पुल, रामसेतु पुलासह अनेक छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. तसंच रामकुंड आणि लक्ष्मण कुंड परिसर पाण्याखाली गेला आहे. गोदावरी नदी शेजारी असणारी अनेक छोटी मंदिर पाण्याखाली गेले आहेत.

nashik flood
गोदावरी नदीला पूर

गंगापूर धरण ७५ टक्के भरले

नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. नाशिकच्या त्रंबकेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरण जवळपास 75 टक्क्यापेक्षा जास्त भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी गंगापूर धरणात जात असल्याने जिल्हा प्रशासनाने टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे. सध्या गंगापूर धरणातून 4700 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पहिला पूर आलाय.

- Advertisement -
nashik flood
तोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी

नदी काठच्य गावांना सतर्कतेचा इशारा

इगतपुरीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत आहे. त्याचसोबत पेठ, त्र्यंबक, सुरगणा या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दारणा धरणातून ६६०० क्युसेक्स तर नांदूर मध्यमेश्वर मधून ७२०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी कायम राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -