सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं – सत्यजित तांबे

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. सत्यजीत तांबेंना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

satyajeet tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. सत्यजीत तांबेंना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी ‘सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं’, अशी प्रतिक्रिय दिली. तसेच, 4 फेब्रुवारी रोजी आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले. (nashik graduate constituency all political party workers supported me says satyajeet tambe reaction after victor)

राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मदत केल्याचे तांबेंनी सांगितले. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल, असेही तांबे म्हणाले. मतदान बाद होण्याचं प्रमाण मोठं आहे. बाद मतदानामुळे माझे मताधिक्य कमी झाल्याचेही तांबे यावेळी म्हणाले.

सत्यजित तांबे 29 हजार 465 मतांनी विजयी

पदवीधर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. युवा नेतृत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजीत तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत. जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजीत तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.

16 पैकी 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

निवडणुकीत उमेदवारांना विजयी होण्यासाठी 58 हजार 310 मतांची आवशक्यचा होती. सत्यजित तांबे यांनी ठरवून दिलेला निर्धारित टप्पा पार करत 68 हजार 999 मते मिळवत विजय संपादन केला. या निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना निर्धारित कोट्याच्या 10 टक्के मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, तांबे आणि पाटील वगळता इतर 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.


हेही वाचा – Amul Milk Price Hike : अर्थसंकल्पानंतर सामान्यांना फटका; अमूलच्या दुधाच्या किमतीत वाढ