घरमहाराष्ट्रनाशिकNashik Loksabha: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा? ठाकरे-पवार आमनेसामने

Nashik Loksabha: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा? ठाकरे-पवार आमनेसामने

Subscribe

नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. खरं तर परंपरेनुसार नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट) मिळायला हवा. मात्र आता या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार ) उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीने या जागेची मागणी केल्याने ठाकरे विरुद्ध पवार असा सामना येत्या काळात रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय? असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. (Nashik Loksabha A grain of salt in Mahavikas Aghadi from Nashik Loksabha Constituency Thackeray Pawar face to face)

महाविकास आघाडीत मिठाचा खडा?

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेचा उमेदवार नाशिकमधून निवडून येऊ शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केला आहे. गोकुळ पिंगळे यांच्या दाव्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद

दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद आहे, असा दावा शिवसेनेने (उद्धव ठाकरे) करून राष्ट्रवादीवर (शरद पवार गट) पलटवार केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हेच निवडून येणार, असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

काँग्रेसचे 15 आमदार महायुतीत जाणार?

काँग्रेसचे 15 आमदार महायुतीत सहभागी होतील, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधीलच एका एका मोठ्या नेत्याने एका इंग्रजी वेबसाइटला माहिती दिल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच भाजप हे पक्षांतर घडवून आणण्याच्या बेतात असल्याचे, काँग्रेसच्या नेत्याने सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

देशभरात 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या 15 नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता पक्ष सोडू नये, म्हणून काँग्रेसच्यावतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांची पक्ष सोडण्याची कारणे समजून घेतली जात आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: Vijay Wadettiwar ‘त्या’ कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -