काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली सत्यजीत तांबेंच्या चौकशीची मागणी; नेमका वाद काय?

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मोठ्या मतांच्या फरकाने शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंनी पराभव करत विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयानंतर तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मोठ्या मतांच्या फरकाने शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंनी पराभव करत विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयानंतर तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तांबेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. (Nashik Mlc Election Satyajeet Tambe Congress Ab Form Vijay Wadettiwar)

काँग्रेसकडून तांबे यांच्या आरोपांचे खंडन करण्यात आले असेल, तरी पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे विधान करत पक्षात सर्व आलबेल नसल्याचेच सूतोवाच केले. तांबे यांच्या आरोपावरील प्रतिक्रियेसाठी पटोले उपलब्ध झाले नाहीत, मात्र पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तातडीने तांबे यांच्या आरोपांचे खंडण केले आहे. तांबे यांना योग्य एबी अर्ज दिले होते. त्याच्या नक्कल प्रती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘तांबे यांच्या बाबतीत झालेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पक्षाच्यावतीने रविवारी खुलासा केला जाणार आहे’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते सत्यजीत तांबे?

मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितले की, तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचे ठरवले. त्यानुसार मी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान