विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबेंची शुभांगी पाटील यांच्यावर मात; पण चर्चा ‘त्या’ कारचीच!

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असला तरी, सध्या विजयात सहभागी होण्यासाठी ज्या कारमधून सत्यजित तांबे आले त्या, कारची सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण ही कार काँग्रेचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असला तरी, सध्या विजयात सहभागी होण्यासाठी ज्या कारमधून सत्यजित तांबे आले त्या, कारची सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण ही कार काँग्रेचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आहे. (Nashik Mlc Election Satyajeet Tambe Near Of Victory Balasaheb Thorat Car Is In Spotlight)

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मते मिळाली असून, 29 हजार 465 मतांच्या फरकाने त्यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. शुभांगी भास्कर पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली आहे.

या कारमध्ये सत्यजित तांबे असले तरी, बाळासाहेब थोरात प्रत्यक्ष या निवडणूकीत दिसले नाहीत. पण त्यांच्या कारमुळे चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MH 17 BX 567 या क्रमांकाच्या कारवर उभा राहून सत्यजीत तांबे कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करताना दिसत आहेत. याच कारचा वापर करत त्यांनी या निवडणुकीत प्रचार केला आणि विजय मिळवला आहे.

या कारचा क्रमांक नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांना चांगलाच माहिती आहे. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडायला लागल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी आजाराचे कारण देत या निवडणुकीपासून आपण लांब राहिले आहेत.

सत्यजीत तांबे यांनी आपले मामा बाळासाहेब थोरात यांची कार संपूर्ण प्रचारादरम्यान वापरली. याचा अर्थ हाच की, यातून तांबेंना मतदारांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जो संदेश द्यायचा होता तो देण्यात ते यशस्वी ठरले आणि आमदार बनण्याच्या जवळपास पोहोचले आहेत.

या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी रात्री अधिकृत निकाल जाहीर केला. रात्री १० वाजता सत्यजित तांबे यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली.


हेही वाचा – विजयाच्या जवळ, पण जल्लोष नको; जीवलगाच्या निधनामुळे सत्यजीत तांबे भावूक